Belagavi

परीक्षेच्या भीतीने बेळगावात विद्यार्थीनीची आत्महत्या

Share

बेळगाव शहरातील विश्वेश्वरय्या नगर येथेएसएसएलसी परीक्षेतील अपयशाच्या भीतीने एका 16 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी उघडकीस आली असून, या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बेळगाव शहरातील विश्वेश्वरय्या नगर येथील फॉरेस्ट क्वार्टर्समध्ये राहणारी दीपाली राजेंद्र बडिगेर (वय 16) हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. ती सध्या एसएसएलसी परीक्षा देत होती आणि मंगळवारी तिने दुसऱ्या विषयाची परीक्षा दिली होती. परीक्षा संपवून घरी परतल्यानंतर घरात कोणी नसताना दीपालीने टोकाचे पाऊल उचलले. संध्याकाळी तिचे कुटुंबीय परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. घरातच मुलीचा मृतदेह पाहून कुटुंबीयांचा आक्रोश अनावर झाला.

या घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयाच्या शवागृहात पाठवण्यात आला आहे. या आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

Tags: