Belagavi

विजया ऑर्थो आणि ट्रॉमा सेंटरमध्ये नवीन डायलिसिस सेंटर : रुग्णांना 700 रुपयांमध्ये 24 तास सेवा

Share

‘ आयू फाउंडेशन आणि रोटरॅक्ट ‘ ने गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांच्या हितासाठी बेळगाव येथील विजया ऑर्थो आणि ट्रॉमा सेंटरमध्ये एक नवीन डायलिसिस सेंटर सुरू केले असल्याची माहिती डॉ. मनोज सुतार यांनी दिली आहे.

ते आज बेळगाव शहरात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांच्या हितासाठी नवीन डायलिसिस सेंटर सुरू कण्यात आले आहे. विजयकांत डेअरीचे शिवकांत सिदनाळ, दीपा सिदनाळ, विजया हॉस्पिटलचे डॉ. रवी पाटील, रोटरॅक्टचे निखिल चिंडक आणि इतर मान्यवरांनी यासाठी सहकार्य केले आहे. शिक्षण आणि वैद्यकीय सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने या फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. आमचे मुख्य उद्दिष्ट सर्वसामान्यांना शिक्षण आणि वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या समस्येचे निराकरण करणे आहे. सरकारी शाळांमध्ये शौचालये आधीच बांधली गेली आहेत. याव्यतिरिक्त, एक डायलिसिस सेंटर देखील सुरू करण्यात आले आहे. जर्मनीहून लाखो रुपयांच्या यंत्रणा डायलिसिस सेंटरमध्ये आणण्यात आल्या आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले.

सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्यास पाठबळ मिळाले.. विजयकांत सीदनाळ यांनी केंद्राला डायलिसिस यंत्रणा उपलब्ध करून देण्यासंदर्भात विशेष परिश्रम घेतले. डॉक्टर रवी पाटील यांच्या विनंतीनुसार डॉक्टर मनोज सुतार यांनीही याकरिता परिश्रम घेतल्याचे निखिल चिंडक यांनी सांगितले.

विजया हॉस्पिटलचे संचालक डॉ. सेवा रवी पाटील यांनी मान्यवरांच्या मदतीने ही सेवा सुरू केली. डॉ. मनोज सुतार यांनी अवघ्या 15 दिवसांत 3 डायलसीस मशीन्स दान केल्या आहेत. रुग्णांना 700 रुपयांमध्ये 24 तास सेवा उपलब्ध असेल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी मनोज सुतार, विजयकांत सिदनाळ, दीपा सिदनाळ, निखिल चिंडक, नीलेश पाटील. सोमशेखर पुजारी, विजय पाटील यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: