घटप्रभा येथे कर्नाटक बंदला समिश्र प्रतिसाद लाभला. महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याची मागणी करीत काही कन्नडिगांनी निदर्शने केली. काही आस्थापन चालकानी स्वयंस्फूर्तीने आस्थापने बंद करून बंदला पाठिंबा व्यक्त केला.
मृत्युंजय चौकात जमलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत त निदर्शने केली. इतकेच नव्हे तर महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घाला अशी मागणी करीत काही काळ महामार्गही रोखला तसेच याबाबतचे निवेदन घटप्रभा पोलीस ठाण्याकडे सोपविण्यात आले.

यावेळी कन्नड रक्षण वेदिकेचे केंपन्न चौकाशी, कन्नड रक्षण वेदिकेच्या शेतकरी विभागाचे जिल्हाध्यक्ष रेहमान मोकाशी, कन्नड सेनेचे तालुका अध्यक्ष अप्पासाब मुल्ला, कन्नड रक्षण वेदिकेचे अरळीकट्टी विभागाचे अध्यक्ष प्रशांत अरळीकट्टी, कन्नड रक्षण वेदिकेचे तालुका अध्यक्ष रवी नावी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments