Belagavi

आमदार राजु सेठ यांनी रस्ता करून बसवण कुडची वासियांना दिला आधार

Share

बसवण कुडची येथील ग्राम दैवत असलेल्या श्री बसवान्ना श्री कलमेश्वर व ब्राम्हदेवाची इंगळ्यांची जत्रा सोमवारी दि 24 रोजी आंबील गाडे व मंगळवारी इंगळ्या असल्याने गावात आंबील गाड्यांची मिरवणूक काढली जाते.त्यानिमित्ताने गावातील गाडे पळवणारा तळ्याजवळील गाडे मार्ग खूप खराब असल्याने गाडे पळवणे खूप कठीण झाले होते. या रस्त्याची दुर्दशा झालेली पाहून काँग्रेस कार्यकर्त्यांनी व गावकऱ्यांनी ही बाब आमदार सेठ यांणा सांगितल्याने आमदार .

सेठ यांनी लागलीच रस्त्याच्या कामाला सुरवात केली असून गावकऱ्यांनी त्यांच्या कामाबदल समाधान वेक्त केले आहे. यावेळी समाजसेवक व काँग्रेस कार्यकर्ता सुनील अणगोळकर, सागर तारिहाळकर, बसवराज सावकार, प्रकाश मुतगेकर, बसवंत बेडका,पापुल मुल्ला व गावकरी उपस्थित होते.

Tags: