Belagavi

15 व्या जूनियर्स ,मास्टर्स, दिव्यांग शरीरसौष्ठव स्पर्धेत होणार कर्नाटक संघ सहभागी

Share

या महिन्यात होणाऱ्या 15 व्या जूनियर्स ,मास्टर्स आणि दिव्यांग शरीरसौष्ठव स्पर्धा -2025 मध्ये कर्नाटक शरीरसौष्ठव संघ भाग घेणार आहे. याकरिता बेळगाव सह विविध ठिकाणच्या शरीरसौष्ठवपटूंची निवड करण्यात आली आहे.

दिनांक 29 आणि 30 मार्च रोजी छत्तीसगड येथील बिलासपूर येथे ही 15 वी जूनियर्स, मास्टर्स आणि दिव्यांग शरीरसौष्ठव स्पर्धा होणार आहे.

बेळगाव येथील श्रीशिव मोदगेकर, श्रवण लाड, विनीत हनमशेठ शिवणगौडा खेतगौडर, प्रताप कालकुंद्रीकर, राजकुमार बोकडे, जितेंद्र काकतीकर, अविनाश परीट, एस भरत, चिराग आर, राघवेंद्र नायक, हेमंत कुमार श्रवणं, साहेबलाल छप्परबंद,सदानंद,लक्ष्मण बी आणि मोहम्मद हुसेन जमादार हे कर्नाटकाचे संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत, असे कर्नाटक बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले आहे .

Tags: