Belagavi

शेतवाडीत मुलीसोबत बसलेल्या तरुणाला मारहाण : चौघांना अटक

Share

बेळगाव : सावगाव रोडवरील शिवारात मैत्रिणी सोबत बोलत उभे असणाऱ्या तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी चौघांवर गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे.

बेळगाव तालुक्यातील सावगाव रोडवरील शेतवडीत खानापूर तालुक्यातील एक तरुण आपल्या मैत्रिणी सोबत बोलत बसला होता. यावेळी सुदेश पाटील, संतोष जाधव, जय इंजल आणि सुमित मोरे या चौघांनी तिथे जाऊन त्या तरुण आणि तरुणीची चौकशी केली. यावेळी तरुण आणि तरुणी ह्या दोन वेगवेगळ्या गटाच्या असल्याचे समजले. यामुळे त्या चौघांनी मुलीला घरी पाठविले आणि त्या तरुणाला मारहान करून धमकावले.

याप्रकरणी त्या चौघांवर बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल करून त्या चौघांना अटक करण्यात आली.

Tags: