Belagavi

इन्फंट्री गोल्फ चॅम्पियनशिप स्पर्धा : मिहीर पोतदार चॅम्पियनशिपचा मानकरी तर भारतीय लष्कराचे मोहन नाईक ठरले संयुक्त विजेते

Share

बेळगाव : पर्यावरण आणि प्रशिक्षण विभाग बेळगाव यांच्यावतीने इन्फंट्री गोल्फ चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजिण्यात आली होती. या स्पर्धेत मिहीर पोतदार हा इन्फंट्री गोल्फ चॅम्पियनशिप चा मानकरी ठरला. भारतीय लष्कराचे मोहन नाईक हे संयुक्त विजेते ठरले.

बेळगाव येथील पर्यावरणीय भाग आणि प्रशिक्षण क्षेत्र यांच्यावतीने इन्फंट्री गोल्फ चॅम्पियनशिप चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र, बेळगाव, बेंगळूर, हुबळी, कोल्हापूर आणि गोवा यासह विविध ठिकाणांहून सुमारे 149 स्पर्धकांनी भाग घेतला होता.

5 गटात ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत भारतीय लष्कराचे मोहन नाईक हे संयुक्त विजेते ठरले. कर्नल संतोष यांनी इन्फंट्री, मिहिर पोतदार स्पर्धेची विजेती ठरल्याचे इन न्यूजशी बोलताना सांगितले.

याप्रसंगी पर्यावरणीय भाग आणि प्रशिक्षण क्षेत्राचे सदस्य उपस्थित होते.

Tags: