अर्थसंकल्पात उत्तर कर्नाटकावर झालेला अन्याय आणि कंत्राटात अल्पसंख्याकांसाठी ठेवण्यात आलेले आरक्षण, याचा तीव्र शब्दात निषेध करीत या विरोधात राज्य भाजपच्या वतीने विधिमंडळात आत आणि बाहेर निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती कर्नाटक राज्य भाजपचे अध्यक्ष विजयेंद्र यांनी दिली आहे
बेळगाव मध्ये मराठी आणि कानडी भाषिकात तेढ निर्माण करू पाहणाऱ्या समाजकंटकावर कठोर कारवाई करावी असे भाजप राज्याध्यक्ष बी वाय विजयेंद्र म्हणाले.
बेळगाव येथील सांबरा विमानतळावर प्रसार माध्यमांशी बोलताना विजयेंद्र यांनी, बेळगाव महापालिका महापौर आणि महापौर निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे. बेळगाव महापालिकेवर भाजपचा ध्वज फडकला आहे, याबद्दल समाधान व्यक्त करीत त्यांनी नूतन महापौरआणि उपमहापौरांचे अभिनंदन केले. तसेच नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौराने सर्व भाषिकांना आणि सर्व समाजाला सोबत घेऊन बेळगाव शहराचा सर्वांगीण विकास साधावा असे आवाहन केले.
अर्थसंकल्पात, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी, अर्थसंकल्पात अल्पसंख्याकांसाठी कंत्राताट 4% तरतूद केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत अल्पसंख्याकांना कंत्राटात 4 टक्के आरक्षण देण्याची घोषणा करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे, जो असंविधानिक आहे. काँग्रेस सरकारचा हा निर्णय धर्मा- धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने आहे, हे दुर्दैवी आहे. भाजप याविरोधात सभागृहाच्या आत आणि बाहेर निदर्शने करेल, असा इशारा विजयेंद्र यांनी दिला.
भाजप सरकारच्या काळात, उत्तर कर्नाटकातील जलसिंचन प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात सुमारे 19 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. तथापि, राज्य सरकार जलसिंचन प्रकल्पांवर स्थगिती आणत आहे. गॅरेंटी योजनामध्ये गुरफटलेले सरकार विकास विसरले आहे. अर्थसंकल्पात उत्तर कर्नाटक झालेले दुर्लक्ष पाहता सरकारला त्तर कर्नाटकच्या विकासाबद्दल कोणतीही चिंता नाही, हे सिद्ध करते असेही विजयेंद्र म्हणाले.
बेळगाव मध्ये कन्नड आणि मराठी भाषेत गुण्यागोविंदाने नांदत आहेत. मात्र भाषिक तेढ निर्माण करण्यासाठी काही समाजकंटकांकडून मराठी आणि कन्नड भाषिकांमधील बंधुत्वता मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा अक्षम्य अपराध आहे. सरकारने याचा गंभीर्याने विचार केला पाहिजेत असेही ते म्हणाले.
याप्रसंगी माजी आमदार आणि भाजप राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके, माजी आमदार संजय पाटील, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यास अन्य मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments