बेळगाव शहरातील दोन नगरसेवकांचे सदस्यत्व अपात्र ठरवल्याबद्दल प्रादेशिक आयुक्तांविरुद्ध राज्यपालांकडे तक्रार दाखल करण्यात आले असून न्याय मिळेल असा विश्वास बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी व्यक्त केला.
ते आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते अरविंद बेल्लद यांच्या समवेत राज्यपालांची भेट घेण्यात आली असून, आबेळगाव महानगरपालिकेच्या दोन सदस्यांच्या अपात्रतेची माहिती दिली आहे. बेळगाव प्रादेशिक आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशाची प्रत राज्यपालांना देण्यात आली आहे. राज्यपालांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.
महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत अपात्र ठरलेल्या दोन्ही नगरसेवकांना मतदानाचा अधिकार मिळेल, असा विश्वास आहे. कितीही अनधिकृत आदेश दिले तरी आपल्याला न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


Recent Comments