१६ फेब्रुवारी रोजी विश्व हिंदू परिषद-बजरंग दल बेळगाव यांच्या वतीने बेळगाव शहरात शौर्य संचलन यात्रा आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा उपाध्यक्ष मुनीस्वामी भंडारी यांनी दिली.
शुक्रवारी बेळगावात बोलविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. १६ फेब्रुवारी रोजी बेळगाव शहरात विश्व हिंदू परिषद-बजरंग दल बेळगाव तर्फे शौर्य संचलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी गीता जयंतीच्या दिवशी बाबरी मशीद पडून तिथे एक लहानसा मंदिर बांधण्यात आले. याचाच प्रतीक म्हणून शौर्य संचलन यात्रा बेळगाव आणि चिक्कोडी विभागात आयोजित केली जाईल.
रविवार, १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता सरदार मैदान ते छत्रपती संभाजी पार्क पर्यंत रॅली काढण्यात येईल. बजरंग दलाचे राष्ट्रीय प्रवक्ते नीरज डोनेरिया हे प्रमुख पाहुणे असतील. गदग येथील श्री शिवानंद ब्रह्ममठाचे शिवानंद स्वामीजी यांचे दिव्या सान्निध्यात हा कार्यक्रम होणार आहे. हिंदू समाजाचे रक्षण आणि सेवा करण्यासाठी सुमारे २००० कार्यकर्ते या रॅलीत सहभागी होतील, असे त्यांनी सांगितले. बजरंग दलाचे विभाग समन्वयक लक्ष्मण मिसाळे यांनीही याबद्दल अधिक माहिती दिली.
यावेळी आनंद करलिंगणवार, संतोष मादिगर , विनोद पाटील, सुनील गौरन्ना आणि इतर उपस्थित होते.


Recent Comments