बेळगावच्या कॅम्प परिसरातील रोहिदास कॉलनीत संत शिरोमणी रोहिदास यांची जयंती साजरी करण्यात आली.
संत रोहिदास समाजातर्फे आयोजित केलेल्या या जयंती कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी संत श्री रोहिदास महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यानंतर नंतर, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित नागपूर शिक्षण मंडळ अनुसंधान केंद्राचे संचालक संदीप सन्नक्की यांनी संत श्री रोहिदास महाराजांचा इतिहास उलगडून सांगितला. संत रोहिदास महाराजांच्या आदर्शांचे पालन केले पाहिजे असे ते म्हणाले.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल कर्नाटक चर्मकार महासभेचे अध्यक्ष भीमराव पवार, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नामांकित सदस्य सुधीर तुपेकर, अरुणा काळे, देवधर धारवाड, अप्पू चौहान, गणपती काळे आणि इतर उपस्थित होते.


Recent Comments