बेळगावचे नागरसेवक जयंत जाधव आणि मंगेश पवार यांचे सदस्यत्व बेळगाव प्रादेशिक आयुक्तांच्या न्यायालयाने राजकीय दबावामुळे अपात्र ठरवले आहे, याचा विरोधात आपण राज्यपालांकडे तक्रार करणार आहोत असे दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी सांगितले.
बेळगावच्या खाऊकट्टा येथील दुकाने बेकायदेशीरपणे घेतल्याबद्दल बेळगाव प्रादेशिक आयुक्तांच्या न्यायालयाने बेळगाव शहरातील अधिकारी जयंत जाधव आणि मंगेश पवार यांचे सदस्यत्व अपात्र ठरवले आहे. या पार्श्वभूमीवर आज खाऊ कट्टा येथे बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले कि, सरकारच्या दबावाला खाली बेळगावच्या प्रादेशिक आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. याविरुद्ध राज्यपालांकडे तक्रार केली जाईल. आयएएस अधिकाऱ्यांच्या अधिकारक्षेत्रातील प्राधिकरणाकडेही तक्रार दाखल केली जाईल.त्यांच्या सेवाकाळात त्यांनी घेतलेल्या बेकायदेशीर निर्णयांची चौकशी केली जाईल.
या दोघांनी नगरसेवक म्हणून निवडून येण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लिलाव प्रक्रियेद्वारे गाळे मिळवले होते. मात्र सरकारच्या दबावाखाली येऊन असा बेकायदेशीरपणे निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांना धडा शिकविण्यात येईल. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील दुकानांना महानगरपालिका कायदा लागू होत नाही.हा लढा कायदेशीररित्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून लढला जाईल.


Recent Comments