Belagavi

बेळगाव येथील श्री बनशंकरी देवीची यात्रा

Share

बेळगावातील भडकल गल्ली येथील श्री बनशंकरी देवीच्या माघ शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या उत्सवाला भक्तीभावाने सुरुवात झाली आहे.

बेळगावच्या देवांग हटगार समाजाच्या श्री बनशंकरी मंदिर विश्वस्त समितीकडून बेळगावातील भडकल गल्ली येथील श्री बनशंकरी मंदिरात श्री बनशंकरीदेवीच्या माघ शुक्ल पक्ष पौर्णिमेचा उत्सव भक्तीभावाने साजरा केला जात आहे.

शनिवार, ८ फेब्रुवारीपासून महामंगलाआरती, महाअभिषेक आणि श्री दुर्गा सप्तशती पारायणासह विविध विधी आयोजित करण्यात आले.आज सकाळी अभिषेक, मंगलआरती आणि नवचंडी होम पार पडले.उद्या, बुधवारी सकाळी अभिषेक, पूजा,सुहासिनींची ओठी भरण्याचा कार्यक्रम, देवीची पालखी मिरवणूक आणि भव्य आरती होईल.त्यानंतर, दुपारी महाप्रसाद होणार असून याचा लाभे घेण्याचे आवाहन मंदिर समितीच्या अध्यक्षांनी आपली मराठीच्या माध्यमातून केले आहे.

या कार्यक्रमात शेकडो भाविक सहभागी झाले होते. धार्मिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिर समितीचे सदस्य आणि पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

Tags: