Belagavi

काँग्रेसला युवावर्गाचा पाठिंबा ; युवा सचिवपदी राहुल जारकीहोळी

Share

काँग्रेस पक्षात कोणतेही मतभेद नाहीत. सर्वांना विश्वासात घेऊन पक्षाचा विकास करण्यासाठी परिश्रम घेण्यात येईल असे प्रदेश काँग्रेस युवा सचिव राहुल जारकीहोली म्हणाले.

प्रदेश युवा काँग्रेस सचिवपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच बेळगाव येथील काँग्रेस भवनात आलेले राहुल जारकीहोळी यांचे काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी भव्य स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी करत फुलांचा वर्षाव आणि आरतीसह त्यांचे विशेष स्वागत करण्यात आले

यानंतर, बेळगाव काँग्रेसने प्रदेश युवा काँग्रेस सचिवपदी निवडून आलेले राहुल जारकीहोळी यांचा सत्कार आणि अभिनंदन करण्यात आले. त्या नंतर आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना, प्रदेश युवा काँग्रेसचे सचिव राहुल जारकीहोळी म्हणाले की, ते गेल्या काही दिवसांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत आणि आता पक्षाने त्यांना दिलेली जबाबदारी स्वीकारून सेवा करतील. महामंडळाच्या सदस्यांची जागा भरण्यात आली येत आहे. पक्षाचे नेते इतर कार्यकर्त्यांनाही जबाबदारी देण्याचे काम करत आहेत.जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुका जिंकण्यासाठी परिश्रम करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील विद्यार्थी आणि तरुणांसमोरील रोजगार समस्या आणि इतर समस्या सोडवण्यासाठी काँग्रेस सरकारने पावले उचलली आहेत. याच्यामुळे तरुणांनी पाठिम्बा दिलाआहे. आमच्या पक्षात कोणताही गोंधळ नाही. सर्वांना विश्वासात घेऊन काम केले जात आहे असे ते म्हणाले.

राज्यस्तरीय युवा परिषदेबाबत चर्चा सुरू आहे. प्रदेश काँग्रेस विरोधी पक्षात असतानाही युवा समिती सक्रिय होती.अनेक मुद्द्यांवर आवाज उठवण्यात आला आहे आणि निषेध करण्यात आला आहे. मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली सेवा दलाच्या माध्यमातून तरुणांना काँग्रेस पक्षाच्या कार्याची माहिती देण्याचे काम केले जात आहे.

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी १ लाख ८० हजार मते देऊन आशीर्वाद दिला आहे. त्यांचे वडील मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली ते तरुणांना पक्षाकडे आकर्षित करून पक्ष मजबूत करण्यासाठी कठोर परिश्रम करतील. त्यांना निवडून दिल्याबद्दल ज्येष्ठ नेते आणि युवा समुदायाचे आभार मानले.ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी यांनी राहुल जारकीहोळी यांना युवा काँग्रेस सचिवपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.

या प्रसंगी युवा काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष कार्तिक पाटील, बेळगाव शहर अध्यक्ष सागर दिवटे, चिक्कोडी जिल्हाध्यक्ष सिद्दीक अंकलगी, जिल्हा सरचिटणीस प्रदीप एम.जे., बसवराज शेगावी, बेळगाव दक्षिण मतदारसंघातील पदाधिकारी, राजा सलीम काशमनवर, आयेशा सनदी व इतर उपस्थित होते.

Tags: