बेळगावमध्ये आज पहाटे पेट्रोल पंपावरील एटीएमला आग लागली. अग्निशमन विभागाशी संपर्क न झाल्याने स्थानिकांनी जवळच्या टँकरच्या मदतीने आग विझवली. यामुळे मोठा अनर्थ टळला.
बेळगाव तालुक्यातील काकती गावात राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या गती पेट्रोल पंपावर अॅक्सिस बँकेचे एटीएम आहे.आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. स्थानिकांनी याची माहिती तात्काळ ग्रामपंचायत सदस्य गजानन गव्हाणे यांना दिली. त्यांनी अग्निशमन विभागाला कितीही फोन केला तरी संपर्क झाला नाही, म्हणून त्यांनी जवळच्या पाण्याच्या टँकरशी संपर्क साधला आणि आग विझवली.
पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांनीही याबद्दल माहिती दिली. अग्निशमन विभागाला अनेक वेळा फोन करूनही त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.काकती पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अग्निशमन दलाला फोन केला तरी त्यांचा संपर्क होऊ शकला नाही आणि शेवटी स्थानिकांनी स्वतः आग विझवली.
पाण्याच्या टँकरचे मालक सय्यद, राज नारायण पांडे, त्रिलोकचंद पटेल, अरबाज नालबंद, नझीर अहमद, रोशन जमीर, मस्तान, सादिक, यासीन, सुधा मल्लप्पनवर, मेघा केस्ती आणि पेट्रोल पंपच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची काळजी न करता आग विझविण्याचे काम केले.
[


Recent Comments