बेळगाव युवा काँग्रेस समितीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून, शहरातील राणी चेन्नम्मा चौक येथे नवीन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला.
आज बेळगाव युवा काँग्रेस समितीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून, शहरातील राणी चेन्नम्मा चौक येथे नवीन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला.
बेळगाव जिल्हा काँग्रेस युवा समितीच्या अध्यक्षपदी सागर, उपाध्यक्षपदी अकिब बेपारी, सचिवपदी रफिक बनदर, जिल्हा सचिवपदी गौस गवंडी, उत्तर विभागाच्या अध्यक्षपदी नुमान मुकाशी, माळमारुती ब्लॉकच्या अध्यक्षपदी शाहबाज मुजावर, छावणी परिषद विभागाच्या अध्यक्षपदी सैफअली बेपारी, उपाध्यक्षपदी जोहैब सिद्दीकी, दक्षिण विभागाच्या उपाध्यक्षपदी अहमद मजगावकर, दक्षिण चेन्नम्मा ब्लॉकच्या उपाध्यक्षपदी जुनैद पीरजादे आणि छावणी परिषद विभागाच्या उपाध्यक्षपदी श्लोक कडोलाकर यांची निवड झाली आहे.
जिल्हा काँग्रेस युवा समितीचे उपाध्यक्ष अकिब बेपारी आणि उत्तर विभागाचे अध्यक्ष नुमान मुकाशी यांनी याबद्दल आपली मराठीला अधिक माहिती दिली.


Recent Comments