Belagavi

उद्या बेळगाव शहरात मिस्टर कर्नाटक, मिस्टर बेळगाव , मिस बेळगाव, मिसेस बेळगाव फॅशन स्पर्धा

Share

बेळगावकरांच्या मागणीनुसार पुन्हा एकदा बेळगावमध्ये होत आहे इंटरनॅशनल फॅशन वीक-२०२५. त्यामध्ये बेळगावच्या फॅशनप्रेमींना मिळणार आहे मिस्टर कर्नाटक, मिस्टर बेळगाव , मिस बेळगाव, मिसेस बेळगाव ‘किताब पटकाविण्याची संधी.

नील क्रिएशन्स अँड एन्टरटेनमेंट्सच्या वतीने बेळगाव शहरात होत आहे इंटरनॅशनल फॅशन वीक २०२५. ज्यामध्ये बेळगावच्या फॅशनप्रेमींना मिळणार आहे, मिस्टर कर्नाटक, मिस्टर बेळगाव , मिस बेळगाव, मिसेस बेळगाव ‘किताब पटकाविण्याची संधी. उद्या रविवारी दि. ९ फेब्रुवारी रोजी बेळगाव शहरातील क्लब रोड येथील ईफा हॉटेल येथे सांयकाळी ५ ते ९ च्या दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. मिस्टर कर्नाटक विजेत्याला २५ हजार रुपये , मिस्टर बेळगाव विजेत्याला १५ हजार रुपये , मिस बेळगाव विजेत्याला १० हजार रुपये तर मिसेस बेळगाव विजेत्याला ५ हजार रुपये बक्षीस मिळणार आहे. स्पर्धकांसाठी २५०० रुपये प्रवेश शुल्क असून प्रेक्षकांसाठी प्रवेश विनामूल्य आहे. अधिक माहितीसाठी 8792413365 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा .

Tags: