जय भीम ग्रुप आणि माता रमाबाई आंबेडकर फाउंडेशन, बेळगाव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या अंतर्गत, 2024 साली सर्वोत्कृष्ट चित्र रथ, घरात जयंती सजावट आणि चित्रकला स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिक वितरण समारंभ बेळगाव येथील कन्नड साहित्य भवन येथे आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून , हेस्कॉमचे आश्विन शिंदे, दलित नेते मल्लेश चौगुले बसवराज रायवगोल, दीपक कांबळे, लोकेश नीलन्नवर किरण नीलजीउपस्थित होते . यावेळी विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले .
सर्वोत्तम चित्र रथ स्पर्धेत:
प्रथम पारितोषिक: नव बौद्ध युवक मंडळ, होसूर
दुसरे पारितोषिक: जय भीम युवक मंडळ, कंग्राळ गल्ली
तिसरे पारितोषिक: जय भीम शक्ति युवक मंडळ, नाझर कॅम्प वडगाव

घरातील बाबासाहेब आंबेडकर जयंती सजावट स्पर्धेत:
प्रथम पारितोषिक: रवि कांबळे, वाघवडे , बेळगाव
दुसरे पारितोषिक: अभिषेक आणि अनुराग देवरणी, कंग्राळ गल्ली , बेळगाव
तिसरे पारितोषिक: उदय बस्तवाडकर, धामणे , बेळगाव
तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक: शिद्राई काकतिकर, आझम नगर, बेळगाव याना देण्यात आले .
चित्रकला स्पर्धेत:
प्रथम पारितोषिक: , तनिष्क . बस्तवाडकर
दुसरे पारितोषिक: , पृथ्वी मेत्री
तिसरे पारितोषिक: प्रार्थना काकतीकर याना वितरित करण्यात आले .

हा कार्यक्रम सुनील बस्तवाडकर , दयानंद बस्तवाडकर, शिवराज मोदगे, सूर्यकांत कोलकार , प्रमोद बुक्याळकर, पवन कांबळे, संपत बाळोगी, श्रीनिवास मेत्री, दीपक गस्ते, विनोद भीमण्णवर, विवेक माळगी, सिद्धार्थ कांबळे, चेतक कांबळे आणि इतर उपस्थितांचे सहकार्याने करण्यात आले.


Recent Comments