रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामच्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्त 16 फेब्रुवारी रोजी बेळगाव मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती विनयकुमार बाळीकायी यांनी दिली .
ते गुरुवारी बेळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. बेळगाव रोटरी क्लबने प्रथमच उत्तर कर्नाटकात मोठ्या मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. ही मॅरेथॉन बेळगाव सीपीडी मैदानापासून पहाटे चार वाजता सुरुवात होईल. आमच्या मॅरेथॉन शर्यतीमध्ये स्थानिक तसेच कर्नाटक राज्यासह शेजारील राज्यातील सुमारे 4000 धावपटू सहभागी होतील अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
बेळगाव मॅरेथॉनमध्ये 92 वर्षीय व्यक्ती सहभागी होणार आहे. मॅरेथॉनमध्ये वयानुसार गट पाडण्यात आले आहेत . मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्यांना पारितोषिके दिली जातील . गो ग्रीन’ या थीमवर जनजागृती करण्यासाठी आणि आरोग्य व तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने या शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून हौशी धावपटूंसह बेळगावच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन ती यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगावचे अध्यक्ष विनयकुमार बाळीकाई यांनी केले असे ते म्हणाले.
पत्रकार परिषदेस रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम बेळगावचे सेक्रेटरी लतेश पोरवाल, मार्गदर्शक उमेश रामगुरवाडी, इव्हेंट चेअरमन मल्लिकार्जुन मुरगुडे, जगदीश शिंदे आदी उपस्थित होते


Recent Comments