बेळगाव येथील डॉ. रवी पाटील आरोग्य संस्थांचे संचालक डॉ. रवी बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली जर्मनीतील नामांकित रुग्णालयांच्या सहकार्याने आजपासून 9 जानेवारी दरम्यान होणाऱ्या कॅम्पस इंटरव्ह्यू आणि प्लेसमेंटचा कार्यक्रम सुरू झाला आहे.
फार्मसी बी. फार्मा, नर्सिंग, फिजिओथेरपी आणि अलाईड हेल्थ अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी बेळगावचे डॉ. रवी पाटील आरोग्य संस्थांचे संचालक डॉ. रवी बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली जर्मनीतील नामांकित रुग्णालयांच्या सहकार्याने आजपासून 9 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या कॅम्पस इंटरव्ह्यू आणि प्लेसमेंटचा कार्यक्रम सुरू झाला आहे . या कार्यक्रमात AWO ऑबर-उंड मिटलफ्रांकेनचे उलरीच थेरसिया वाईस, AWO KV नर्नबर्गचे इना स्कोन्वेतेर-क्रेमर, मीडियाटोस GmbH, न्यूरेम्बर्गचे ल्यूकास फर्डिनांड बाल्टसर बर्टल, AWO ऑबर-उंड मिटलफ्रांकेनचे एंरिक रोलँड कार्लटन जॉन, AWO KV नर्नबर्गच्या राहेल स्कोन आणि मीडियाटोस GmbH, न्यूरेम्बर्गचे मॅक्सिमिलियन जॉन हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
चांगल्या नोकऱ्या, चांगला पगार, सेवा सुरक्षा अशा अनेक संधी उपलब्ध करून दिल्या जात असून, विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. तसेच येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची सर्व जबाबदारी घेतली जाईल. सेवा देण्यासाठी चांगले वातावरण निर्माण केले जाईल, असे ते म्हणाले.
जर्मन आरोग्य सेवा संस्थेत रुग्णांना दर्जेदार उपचार देण्यासाठी तज्ञ कर्मचाऱ्यांची गरज आहे आणि भारतातील विद्यार्थ्यांना सेवा देण्याची संधी दिली जात आहे. भारतातील नर्सिंग विद्यार्थ्यांचा रुग्णांप्रती अतिशय मैत्रीपूर्ण दृष्टिकोन असतो. त्यामुळेच त्यांना संधी दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. रवी पाटील म्हणाले, “नर्सिंग कोर्स पूर्ण केलेले विद्यार्थी जर्मनीमध्ये सेवा देण्यासाठी जाऊ शकतात. त्यांना उच्च शिक्षण घेण्याची संधी देखील मिळू शकते. जर्मनीमध्ये सुमारे ३ लाख नर्सिंग कर्मचार्यांची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, जर्मनीमधून आलेले तज्ञ मुलाखत घेऊन निवड करतील. B1, B2 चाचणी देण्यासाठी बेळगावमध्येच विद्यार्थ्यांना सोय उपलब्ध करुन दिली जाईल. आमच्या संस्थेतील प्रशिक्षण घेतल्यावर, विद्यार्थी जर्मनीमध्ये सेवा देण्यासाठी योग्य होतील. जर्मनीमध्ये काम करण्यासाठी आवश्यक असलेल्या भाषेचं प्रशिक्षण देखील देण्यात येईल,” असे ते म्हणाले.
हा कॅम्पस मुलाखत आणि प्लेसमेंट कार्यक्रम अनेक विद्यार्थ्यांना संधी मिळवून देत आहे.


Recent Comments