Belagavi

श्री मुरगेन्द्रगौडा एस पाटील फाऊंडेशनच्या वतीने युवा दिव्यांग जलतरणपटूंना आर्थिक मदत

Share

ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झालेल्या बेळगावच्या युवा दिव्यांग जलतरणपटूंना श्री मुरगेन्द्रगौडा एस पाटील फाऊंडेशनच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली .

बेळगाव येथील युवा खेळाडू सुमित मुतगेकर आणि साहिल जाधव यांनी दिव्यांगांच्या जलतरण क्षेत्रात खूप मोठं यश मिळवले आहे. त्यांची ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे, हे त्यांचं मोठं यश आहे. यांच्या यशाच्या पार्श्वभूमीवर, श्री मुरगेन्द्रगौडा एस पाटील फाऊंडेशनने सुमित आणि साहिल यांचे अभिनंदन करत आर्थीक सहाय्य देखील दिलं आहे

Tags: