Belagavi

अंजनेयनगर येथील श्री गणेश मंदिराचा वर्धापन दिन हजारो भाविकांनी घेतला महाप्रसाद

Share

बेळगावमधील अंजनेय नगर येथील श्री गणेश मंदिराचा वर्धापन दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि धार्मिकतेने संपन्न झाला.

बेळगाव येथील अंजनेय नगर येथील श्री गणेश मंदिराचा वर्धापन दिन कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे रथसप्तमीच्या दिवशी पार पडला. सकाळपासूनच अभिषेक, विशेष पूजा, महाआरतीसह अन्य धार्मिक कार्यक्रम पार पडले. सायंकाळी महाआरती झाल्यानंतर रात्री महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. अंजनेय नगर, माळमारुती, महांतेश नगर येथील अनेक भाविक व लोक सहभागी झाले होते .

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिर समितीचे अध्यक्ष गिरीराज पाटील, सचिव नागराज चिकोर्डे, कृष्णा बेनके, माजी आमदार अनिल बेनके, अरुण मरेनवर, संतोष पर्वतराव, मंजुनाथ कुलकर्णी, महांतेश शेगावी , माजी नगरसेविका पुष्पा पर्वतराव, मदनकुमार भैरप्पनवर आदी मान्यवरांनी परिश्रम घेतले.

Tags: