Belagavi

हेल्मेट घालणं अनिवार्य: पोलीस आयुक्तांची वॉर्निंग

Share

बेळगावमध्ये ट्राफिक पोलीस विभागाकडून नवीन हेल्मेट जनजागृती मोहीम सुरू केली आहे. शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी सर्व बाईकस्वारांना अनिवार्यपणे हेल्मेट घालावे असा इशारा दिला आहे .

त्यांनी आपल्या कार्यालयात माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं, “बेळगावमध्ये प्रोजेक्ट हेल्मेट कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत सुमारे 90% बाईकस्वारांनी हेल्मेट घालणं अनिवार्य असावं, हा आमचा उद्देश आहे” असं त्यांनी स्पष्ट केलं.

या मोहिमेच्या अंतर्गत, सर्वप्रथम पोलीस अधिकार्यांनी हेल्मेट घालणं अनिवार्य ठरविण्यात आलं आहे. प्रोजेक्ट हेल्मेट मोहिमेत आतापर्यंत पोलीस अधिकार्यांवर 6 केसेस नोंदवण्यात आल्या आहेत. त्यानंतर सरकारी कार्यालयांच्या समोर हेल्मेट जनजागृती करण्यात येईल. “जे अधिकारी हेल्मेट घालून बाईक चालवणार नाहीत, त्यांच्या विरोधातही केसेस नोंदवली जातील” असं त्यांनी सांगितलं.

त्यानंतर कॉलेजांच्या समोर देखील हेल्मेट जनजागृती करण्यात येईल. “तरी सर्वांनी अनिवार्यपणे हेल्मेट घालावं,” असं आवाहन त्यांनी केलं.

 

Tags: