पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. यामध्ये पत्नीचा तिच्या पतीसमोर मृत्यू झाला.
बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडीजवळ ही घटना घडली. मुडलगी तालुक्यातील संगनकेरी येथील डॉक्टर कारमधून प्रवास करत होते. लॉरी आणि कारमधील अपघातात डॉ आशा कोळी (३२) यांचा जागीच मृत्यू झाला, तर आशा यांचे पती डॉ. भीमाप्पा कोळी व चालक महेश खोत हे गंभीर जखमी झाले.

कारने लॉरीच्या मागच्या बाजूला धडकली आणि कारचा पुढचा भाग पूर्णपणे चकणाचुर झाला. धारवाडहून बेळगावकडे येत असताना हिरेबागेवाडीजवळ हा अपघात झाला. जखमींना बेळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना हिरेबागेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.


Recent Comments