मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेश उत्सव महामंडळाच्या वतीने विसर्जन मिरवणुकीत दुर्घटनेत मृत झालेल्या कुटुंबीयांना मदत.

यंदाच्या वर्षी गणेश उत्सव दरम्यान शेवटच्या दिवशीच्या विसर्जन मिरवणुकीत कपलेश्वर उड्डाण पुलावरती दुर्घटनेत मृत पावलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत आज देण्यात आली.
मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष श्री रमाकांत दादा कोंडस्करांच्या नेतृत्वाखाली आव्हान करण्यात आलं होतं त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन बेळगाव येथील विविध गणेश मंडळांनी आर्थिक मदत म्हणून महामंडळाकडे रक्कम सुपूर्द केली होती, दुर्घटनेत मृत पावलेले कै. सदानंद चव्हाण पाटील त्यांची पत्नी रूपा सदानंद चव्हाण पाटील व कै. विजय राजगोळकर तेगीन गल्लीत वडगाव त्यांच्या कुटुंबियांना रक्कम पोहोचवण्यात आले.

आज ती रक्कम एकत्रित करून दुर्घटनेत मृत पावलेल्या कुटुंबियांना देण्यात आले. आर्थिक मदत देतेवेळी मध्यवर्तीचे पदाधिकारी श्री चंद्रकांत कोंडुसकर , मध्यवर्ती महामंडळाचे जनसंपर्क प्रमुख श्री विकास कलघटगी , महामंडळाचे कार्यकारी सचिव प्राचार्य श्री आनंद आपटेकर, दसरा महामंडळाचे श्री सचिव विजय तमुचे, बेळगावचा राजा मंडळाचे अध्यक्ष कु.श्रीनाथ पवार,बळवंत शिंदोळकर,कुंज नावगेकर,विनायक पवार, प्रथमेश मोहिते ,प्रशांत आंबेवाडीकर,विनायक सावंत, रवी गोडसे, रोहन सावंत , आनंद आपटेकर आदी या वेळी उपस्थित होते .
श्री सार्वजनिक उत्सव मंडळ कोनवाळ गल्ली छत्रपती शिवाजी रोड ,खडे बाजार , ताशिलदार गल्ली, नेहरूनगर बेळगाव, महाद्वार रोड, हंस टॉकीज रोड गोवावेसचा राजा रामलिंगवाडी शहापूर, अष्टविनायक नगर, वडगाव, कोनवाळ गल्ली या सर्व गणेश उत्सव मंडळाने आर्थिक स्वरूपात महामंडळाकडे रक्कम पोचवली होती.विविध मंडळांनी आपले मंडळाच्या वतीने एक सार्वजनिक विचार धरून एक पाऊल पुढे घेऊन या दुर्घटनेत मदत दिली . त्याबद्दल कुटुंबीयांच्या वतीने व महामंडळाच्या वतीने त्या सर्व मंडळांचा आभार व्यक्त केले


Recent Comments