बेळगाव शहरात जश्न-ए-हजरत ख्वाजा गरीब-उल-नवाज कार्यक्रम पार पडला. यावेळी कव्वाली गाण्याचा कार्यक्रम आयोजण्यात आला होता.

दरवर्षीप्रमाणे, यावेळीही अजमेर दर्गा उर्सनिमित्त बेळगाव शहरात नगरसेवक अझीम पटावेगार यांच्या नेतृत्वाखाली जश्न-ए-हजरत ख्वाजा गरीब-उल-नवाज कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.अजमेर येथील खादीम अब्दुल बार चिस्ती यांच्या उपस्थितीत झालेल्या कव्वाली कार्यक्रमात बेळगाव जिल्ह्याचे प्रभारी व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी सहभागी झाले होते.यावेळी प्रसिद्ध कव्वाल मुजतफा अजीज नाझा आणि मुकर्रम वारसी यांच्या चडता सूरज धीरे धीरे आणि सतीश जारकीहोळी यांच्यावर आधारित कव्वाल्यांनी सर्वांचे वाहवाह मिळवली.

याप्रसंगी नगरसेवक बाबाजान मतवाले, भैरगौडा पाटील, अनंत ब्याकोड, डॉ. सोनावलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी न्यू गांधीनगर जमात आणि यंग कमिटीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.


Recent Comments