पीजीचा विद्यार्थी असल्याची सांगून वैद्यकीय विद्यार्थ्याच्या वेशात एका तरुणाने बीम्स रुग्णालयात राजरोसपणे वावरत होता. त्याच्यावर एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैद्यकीय विद्यार्थ्याच्या वेशात त्यांनी बीम्स हॉस्पिटलच्या वर्ग खोल्यात, प्रसूती वॉर्ड आणि आपत्कालीन विभागात सर्वत्र फेरफटका मारत होता. बीम्सच्या क्लासरूम्समध्ये बसून विद्यार्थ्यांमध्ये खळबळ माजल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.विद्यार्थ्यांशी असभ्य वर्तन करणाऱ्या तरुणाच्या वागण्याला कंटाळून, BIMS मधील नर्सिंग कर्मचाऱ्यांनी BIMS च्या संचालकांकडे तक्रार केली आहे.BIMS व्यवस्थापन मंडळाच्या चौकशीनंतर तो बनावट पीजी विद्यार्थी असल्याची पुष्टी झाली आहे. पीजीचे विद्यार्थी असल्याची बतावणी करणाऱ्या व्यक्तीचे नाव नवलू पाटील (२८) असून महाराष्ट्र मुळचा असल्याची माहिती समोर आली आहे.BIMS चे संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी यांच्या उपस्थितीत नवलू पाटील यांची चौकशी केल्यानंतर बेळगाव एपीएमसी पोलिस ठाण्यात नवलूविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.



Recent Comments