Athani

गावकऱ्यांमध्ये दहशत माजवणाऱ्या मगरीला केले जेरबंद

Share

 

गेल्या सहा महिन्यांपासून गावकऱ्यांमध्ये दहशत माजवणाऱ्या मगरीला पकडून वन अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.

अथणी तालुक्यातील संबरगी गावातील अग्रणी नदीत दिसणाऱ्या सहा फूट मगरीला गावातील तरुणांनी सुखरूप जेरबंद केले आहे.काल सायंकाळी चार वाजल्यापासून मगरीला पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकांनी रात्री उशिरा काठ्या व जाळीच्या सहाय्याने मगरीला रात्री दहाच्या सुमारास पकडले.विशेष म्हणजे एका तरुणाने मगरीला खांद्यावर उचलून गावाच्या वेशीवर आणून वनाधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले.तरुणांच्या या धाडसाचे वनाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी कौतुक केले आहे

Tags: