वेदांत फाऊंडेशन 2025 चे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून शिक्षक पत्रकार व पोलीस अशा नवरत्नांचा “वेदांत एक्सलन्स ॲवॉर्ड” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देवून 1फेब्रुवारी 2025 रोजी सन्मान करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या आदर्श पिढ्या घडविण्याचे कार्य शिक्षक करतात , आपल्या लेखणीतून समाजात घडलेल्या घटनांचे वास्तव निर्भीडपणे मांडण्याचे व समाजाला जागे करण्याचे काम पत्रकार करतात तर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून गुन्हेगारी रोखण्याचे कार्य पोलीस करतात . या गोष्टी लक्षात घेऊन शिक्षक पत्रकार व पोलीस यांना त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी वेदांत फाऊंडेशनच्या वतीने अशा नवरत्नांचा “वेदांत एक्सलन्स ॲवॉर्ड” देवून सन्मान केला जातो . पुरस्कार वितरण करण्याचे हे चौथे वर्ष असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेळगाव उत्तरचे आमदार माननीय असीफ सेट असणार आहेत तर उद्घाटक म्हणून पोलीस आयुक्त IPS याड मार्टीन , एन निरंजन राज अरस डी.सी.पी. क्राईम ॲण्ड ट्राफिक हे उपस्थित राहणार असून प्रमुख वक्ते म्हणून क्षेत्र शिक्षणाधिकारी वाय.जे. भजंत्री तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक श्रीकांत आजगावकर , विश्वभारत सेवा समितीचे अध्यक्ष विजयराव नंदीहळ्ळी , युवराज रत्नाकर , सलामवाडी येथील समाज सेवक एम.ए. पाटील , बेळगाव तालुका सोसायटीचे अध्यक्ष शेखर करंबळकर व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत .

पुरस्कारासाठी निवड झालेल्या मान्यवरांची नावे पुढील प्रमाणे आहेत ‘
शिक्षकांमध्ये : सौ अंजुदेवी केदनूरकर निवृत शिक्षिका उच्च प्राथमिक मराठी शाळा मुतगा , कविता परमाणीक मुख्याध्यापिका महिला विद्यालय इंग्रजी माध्यम ,रघुनाथ उत्तुरकर सरकारी उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 35 मजगाव , सुनिल मल्हारी देसुरकर सह शिक्षक उच्च प्राथमिक मराठी शाळा बसवणकुडची यांना तर पत्रकारांनमध्ये रमेश हिरेमठ जेष्ठ पत्रकार दैनिक तरुण भारत बेळगाव, रविंद्र अण्णाप्पा उप्पार ज्येष्ठ पत्रकार टाईम्स ऑफ इंडिया , संतोष ईश्वरप्पा चिनगुडी जेष्ठ पत्रकार प्रजावाणी तसेच पोलिसांमध्ये बसवराज एम नरगुंद सिव्हील हेड कॉन्स्टेबल ए पी एम सी पोलीस ठाणे , लाडजीसाब मुलतानी सिव्हिल पोलीस कॉन्स्टेबल टिळकवाडी पोलिस ठाणे यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला श्रीकांत आजगावकर यांनी 7000 ,युवराज रत्नाकर यांनी 7000 , एम ए पाटील सलामवाडी यांनी 5000 , विजयराव नंदीहळ्ळी यांनी 5000 अशी देणगी दिली आहे .
वरील कार्यक्रम 1फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी ठीक 11:45 वाजता माहिला विद्यालय मंडळ इंग्रजी माद्यम शाळा कॉलेज रोज बेळगावी येथे हा सम्मान समारंभ आयोजित केला असून सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन फाऊंडेशनचे संस्थापक सतीश पाटील ,अध्यक्ष सविता चंदगडकर , उपाध्यक्ष एन डी मादार व सचीव जयश्री पाटील यांनी कळविले आहे


Recent Comments