Belagavi

प्रजासत्ताकदिना निमित्त विशेष कार्यक्रम

Share

 

प्रजासत्ताकदिना निमित्त मजगाव गावामध्ये जीवन विद्या मिशन ज्ञान साधना केंद्राच्यावतीने शोभायात्रा व प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

बेळगाव तालुक्यातील मजगाव गावात जीवन विद्या मिशन ज्ञान साधना केंद्र बेळगाव व उपकेंद्र माजगावी यांच्या संयुक्त विद्यमाने ७६ वाप्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

यावेळी जीवन विद्या मिशनचे वरिष्ठ सल्लागार प्रभाकर तात्या देसाई, ज्येष्ठ प्रबोधक शंकरराव बांदकर, नगरसेवक रमेश मल्ल्यागोडा व दीपक सातागोडा यांच्या प्रमुख उपस्थितीत बाहुबली तात्या मास्तर, शैलेश शिरोडकर, सतीश बेकवाडकर, खजिनदार दिपक बिर्जे, तानाजी पाटील यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आला. या नंतर प्रबोधनाचा कार्यक्रम झाला.
नंतरगावामध्ये शोभा यात्रा काढण्यात आली .

या नंतर नंतर गावातील ब्रम्हदेवाच्या मंदिराजवळ शोभायात्रा पोहोचली व मानवी साखळी करून देशाच्या उन्नतीसाठी व जागतिक शांततेसाठी कन्नड मराठी विश्व प्रार्थनेने शोभायात्रेची सांगता करण्यात आली

Tags: