बेळगाव भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी सुभाष पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा माजी आमदार व भाजपचे जिल्हा निवडणूक अधिकारी राजशेखर शिलवंत यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
बेळगाव ग्रामीण जिल्ह्याच्या नूतन भाजप अध्यक्षपदी सुभाष पाटील यांची एकमताने निवड झाल्याची घोषणा माजी आमदार तथा भाजपचे जिल्हा निवडणूक अधिकारी राजशेखर शीलवंत यांनी आज भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केली.ते म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा लोकशाहीवर प्रचंड विश्वास असलेला पक्ष आहे. ग्रामीण जिल्ह्यात
बेळगाव हा एकूण 2115 निवडणूक बूथ, 418 पक्ष शक्ती केंद्र, 66 महाशक्ती केंद्रे 2115 बूथमध्ये बूथ कमिट्या तयार करून शंभर टक्के पक्षीय बूथ समित्या स्थापन करणारा राज्यातील पहिला जिल्हा आहे.काही दिवसांपूर्वी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक घेऊन जिल्हाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेबाबत सर्व सदस्यांची मते जाणून घेतली, त्यानंतर नऊ संघटनात्मक मंडळांच्या अध्यक्षांच्या बिनविरोध घोषणा करण्यात आली. बेळगाव ग्रामीण जिल्ह्याच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी सुभाष पाटील यांची भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी एकमताने घोषणा करण्यात आली.
नूतन जिल्हाध्यक्षपदी निवड झालेले सुभाष पाटील म्हणाले, गेल्या एक वर्षापासून जिल्हाध्यक्ष या नात्याने पक्षाच्या संघटनेसाठी प्रामाणिकपणे काम केले आहे.ज्यांनी मला एकमताने निवडून दिले त्या सर्वांचे पुन्हा आभार मानतो, मी तीन वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात फिरून पक्षाची बांधणी करण्यासाठी बुथ स्तरावरुन प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.यासाठी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व नेत्यांनी सहकार्य करावे असे ते म्हणाले.
यावेळी माजी खासदार मंगल अंगडी, माजी आमदार संजय पाटील, विश्वनाथ पाटील, अरविंद पाटील, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा कार्यकारिणी सदस्य लक्ष्मण तापसी, निवडणूक सहसंयोजक एरन्ना चंद्ररगी, जिल्हा सरचिटणीस धनश्री देसाई, राज्य माध्यम समिती सदस्य एफ.एस.सिद्धागौडर, राज्य सोशल मीडिया सदस्य नितीन चौगले, एससी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष यल्लेश कोलकार यांच्यासह पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते


Recent Comments