दक्षिणेची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिक्कोडी तालुक्यातील सुक्षेत्र यडूर येथे श्री वीरभद्रेश्वर जत्रा महोत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री वीरभद्रेश्वराचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक रांगेत उभे असून अत्यंत शांततेने दर्शन घेत आहेत. आज मौनी अमावास्येच्या जत्रेच्या निमित्ताने श्री वीरभद्रेश्वराची विशेष पूजा, सजावट, आरती, नैवेद्य आणि विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी विविध धार्मिक कार्यक्रमनांद्वारे श्री वीरभद्रेश्वर आणि भद्रकाळीचे दर्शन घेतले. त्याशिवाय मंदिराच्या गर्भगृहाभोवती विशेष फुलांची सजावट करण्यात आली होती. बंडीगणीच्या नील माणिक मठाचे अन्नदानेश्वर श्री यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली होती. जत्रेच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे


Recent Comments