Belagavi

दक्षिणेचे आमदार खरे कन्नड चाहते असतील ताकद असेल तर महाराष्ट्रात जाऊन जय कर्नाटकचा जयघोष द्या;महादेव तळवार

Share

बेळगावात जय महाराष्ट्राच्या घोषणा देऊन देखील येथील पोलीस दबावाखाली येऊन कारवाई करीत नाहीत. विरोधाला न जुमानता कार्यक्रम आयोजित करून शिष्टाचाराचे पालन ना करता केवळ वोट बँकसाठी अन्य राज्यांतील पाहुण्यांना आमंत्रित करून त्यांच्या करवी जय महाराष्ट्राचा नारा देणाऱ्या दक्षिणेतील आमदारांना जर ताकत व दम असल्यास महाराष्ट्रात जाऊन जय कर्नाटकाच्या घोषणा देऊदेत असे आव्हान कित्तूर कर्नाटक सेनेचे प्रमुख महादेव तलवार यांनी दिला आहे.

आज बेळगावात बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते, बेळगावच्या अनागोळ येथे जनतेचा विरोध असतानाही छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी बेळगाव दक्षिणच्या आमदारांनी व्होट बँक सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राचे मंत्र्यांना बोलावून त्यांच्या करवी जय महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या. जय महाराष्ट्र म्हटल्यावर निषेध करण्याऐवजी आमदार, महापौर, उपमहापौरांनी टाळ्या वाजवल्या.त्याच्याविरोधात यापूर्वीच निषेध नोंदवण्यात आला असून टिळकवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, ते वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे सांगितले मात्र कारवाई केली नाही. हे प्रकरण न्यायालयाच्या कक्षेत येणार असल्याचे सांगण्यात आले असून पोलीस अधीक्षक व स्टेशन अधिकारी कायद्याचे भान न ठेवता काम करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यात कन्नडिगांची फसवणूक होत असून पोलीस खाते दबावाखाली काम करत आहे. ही बाब कन्नडिगांच्या भावना दुखावणारी आहे. शेतकरी आणि कन्नडिग निदर्शने करीत असताना गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांनी विनापरवाना पुतळ्याचे अनावरण का करू दिले? कायदेशीर सल्लागारांमार्फतही आम्ही लढू आणि उत्तर देऊ, असेही ते म्हणाले.

यापूर्वीच्या पोलिस अधिकाऱ्यांनी कार्यक्षमता दाखवली आहे. पण सध्याचे अधिकारी कन्नडला संरक्षण देत नाहीत. राज्य सरकारने या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करावा. आंदोलन करताना पोलिस येऊ देऊ नका, संबंधित विभागाला कायद्याची लढाई देऊ द्या. दक्षिणेच्या आमदारांना लाज वाटली पाहिजे.अशा राजद्रोही कृत्ये खपवून घेतली जाणार नाहीत, बेळगाव जिल्ह्याचे प्रभारी मंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्याने का घेत नाहीत? दक्षिणेचे आमदार खरे कन्नड चाहते असतील, ताकद असेल तर महाराष्ट्रात जाऊन जय कर्नाटकचा जयघोष द्या. येथील कन्नडिग आणि मराठा यांच्यात विषाची बीजे पेरू नयेत असे म्हणले.
याप्रसंगी कस्तुरी भावी, सुरेश खिराई यांच्यासह कित्तूर कर्नाटक सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Tags: