Belagavi

बेळगाव वाहतूक पोलिसांची कारवाई…

Share

बेळगाव वाहतूक पोलिसांनी आज अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली. शहरातील मध्यवर्ती बसस्थानक ते खडेबाजारपर्यंतचे अतिक्रमण हटवून खडक सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

बेळगाव हे दिवसेंदिवस वाढणारे शहर आहे. तीन राज्यांना जोडणारा शहर असून बेळगाव शहरात दररोज हजारो लोक ये जा करतात. या पार्श्वभूमीवर होणारी वाहतुक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आज बेळगाव वाहतूक स्थानक पोलीस एक्शन मोडवर होते. आज वाहतूक एसीपी जी.आर. निकम, सीपीआय श्रीकांत राठोड यांच्या नेतृत्वाखाली शहरातील मध्यवर्ती बसस्थानकापासून खडेबाजार मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले. फूटपाथ आणि रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांना सक्त ताकीद देण्यात आला.

Tags: