एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूट, बेळगाव B.Sc शुगर सायन्स आणि तंत्रज्ञान आणि M.Sc. कॉलेज आणि बेळगावचे एस. बी. जी आयुर्वेदिक रुग्णालयातर्फे एक दिवसीय मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेळगाव च्या एस. निजलिंगप्पा शुगर कंपनीचे संचालक राजगोपाल यांनी कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितले की, प्रत्येकासाठी निरोगी राहणे अत्यंत आवश्यक आहे.
नंतर एसबीजी आयुर्वेदिक रुग्णालयाच्या आयुर्वेदिक डॉक्टर राधिका केतकर यांनी आयुर्वेदाचे महत्त्व सांगितले. डॉ . अविनाश हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले .

या कार्यक्रमात डॉ. अनुजा कित्तूरकर , डॉ. सुधीर पाटील यांनी संस्थेचे कर्मचारी व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांची मोफत वैद्यकीय तपासणी केली .


Recent Comments