Belagavi

बेळगावच्या सार्वजनिक वाचनालयाचे पत्रकार पुरस्कार जाहीर

Share

बेळगावच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, आमच्या इन न्यूज मराठीच्या उपसंपादिका नीलिमा लोहार यांच्यासह अनेकांची निवड करण्यात आली आहे.

बेळगावच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे , पत्रकार पुरस्कार जाहीर झाला असून, पुढारी वृत्तपत्राचे उपसंपादक संजय सूर्यवंशी यांची 2024 च्या पुरस्कारासाठी, तर न्यूज 18 बेळगावचे जिल्हा विशेष प्रतिनिधी चंद्रकांत सुगंधी यांची कन्नडसाठी निवड करण्यात आली आहे.

सार्वजनिक वाचनालयातर्फे आमच्या इन न्यूज मराठी वाहिनीच्या उपसंपादिका नीलिमा लोहार आणि कन्नड न्यूज चॅनलच्या अँकर लावन्या अनिगोळ यांची प्रा . एस आर जोग महिला पत्रकार पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

शनिवार 18 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता एसीपीआर सभागृह, गुरुदेव रानडे मंदिर हिंदवाडी बेळगाव येथे होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्कार वितरित केले जाणार आहेत .

Tags: