रोटरी क्लब ऑफ बेळगाव आणि बॉडीबिल्डिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव येथे आयोजित 16 व्या राष्ट्रीय स्तरावरील पुरुष व महिला शरीरसौष्ठव स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला.
बेळगाव येथे रोटरी क्लब ऑफ बेळगाव आणि बॉडीबिल्डिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने पुरुष आणि महिलांसाठी 16 वी राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली असून काल झालेल्या स्पर्धेत महिला शरीरसौष्ठवपटूंची कामगिरी उत्कृष्ट ठरली.
यामध्ये देशभरातून 400 हून अधिक पुरुष आणि 40 ते 50 महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. मंत्री सतीश जारकीहोळी यांनी प्रथम पारितोषिक रोख 30 लाख रुपयांचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे. विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले. राष्ट्रीय स्तरावरील दिग्गजांचा निर्णायक सहभाग होता. विविध विभागातील नोकऱ्या , विजेत्यांसाठी राखीव आहेत लष्करासह विविध विभागातील 200 हून अधिक अधिकारी उपस्थित आहेत आणि पदक विजेत्या स्पर्धकांची नोकरीसाठी निवड करतात.
यावेळी कार्यक्रमाचे मिस्टर इंडिया ॲम्बेसेडर सुनील आपटेकर, आयोजक अजित सिद्धन्नावर .
सुहास चांडक डॉ.मनिष हरेकर, गंगधर के, हेमंत हावळ आदी उपस्थित होते.


Recent Comments