महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना आता उपचाराची आवश्यकता नाही. त्या विश्रांती घेऊन पुन्हा जनसेवेतील कामाला लागतील, असे हरिहरच्या वीरशैव लिंगायत पंचमसाली समाजाचे पीठाधीश्वर श्री वचनानंद स्वामीजी म्हणाले.
बुधवारी लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या आरोग्याबाबत विचारल्यानंतर ते पत्रकारांसोबत बोलत होते. लोकप्रिय मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना कार अपघातात दुखापत झाली आहे. त्यांना पाठीवर दुखापत झाली आहे. त्यांच्यासोबत दहा मिनिटे बोललो . लक्ष्मी हेब्बाळकर धैर्यवंत आहेत.
परमेश्वराच्या कृपेमुळे त्यांना काहीही झालेले नाही. कार पाहिल्यावर काय झाले याची भिती वाटत होती. आतापर्यंत त्या निरोगी आहेत, असे सांगितले. अशा प्रसंगात योग, प्राणायामाचा काहीही उपयोग होणार नाही. सचिवांना आता मेडिकल सायन्स उपचार, आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.


Recent Comments