अनगोळ येथील छत्रपती धर्मवीर संभाजी सर्कलमध्ये धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करताना महाराजांचे वंशज आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी जय महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या व आमदार अभय पाटील व महापौर आणि उपमहापौरनै टाळ्या वाजवून प्रोत्साहन दिले.याचा निषेध व्यक्त करीत आज कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्याची महापालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला . यावेळी पोलिसांनी त्यांना अटक केली
आज महापालिकेसमोर कन्नड संघटनांचे कार्यकर्ते महापौर आणि उपमहापौरांचाही निषेध जाण्यासाठी जमले होते . कर्नाटक सरकारच्या अनुदानातून पुतळा उभारण्यास आणि बसविण्यास परवानगी देण्यात आली, आता उद्घाटनावेळी कन्नड भूमीचा अवमान करण्यात आला . यावेळी उपस्थित आमदारांनी, महापौर आणि उपमहापौरांनी टाळ्या वाजवल्या.
आमदार अभय पाटील यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी महापौर व उपमहापौर यांना महापालिका प्रशासनातून बडतर्फ करावे, अन्यथा आगामी काळात आणखी तीव्र संघर्ष छेडण्यात येईल, असा इशारा कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी दिला..
यावेळी महापालिकेत घुसू पाहणाऱ्या कन्नड कार्यकर्त्यांना , पोलिसांनी अटक केली .


Recent Comments