राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेत अपमानास्पद वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा देऊन देशाची माफी मागावी अशी मागणी भारतीय कृषिक समाज व कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली.
संसदेत अपमानास्पद वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या विरोधात भारतीय कृषी समाजाची जिल्हा शाखा आणि कर्नाटक राज्य दलित संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने निदर्शने करण्यात आली.
याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना भारतीय कृषी समाजाचे जिल्हाध्यक्ष सिद्धगौडा मोदगी म्हणाले,लोकशाहीत समान अधिकार देणारे संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबा साहेब आंबेडकर यांचा बद्दल केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी संसदेत केलेला वक्तव्य निंदनीय आहे. त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून हटवण्यात यावे आणि अमित शहा यांनी देशवासीयांची माफी मागावी, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना देण्यात आले आहे.
या वेळी राज्य समिती सदस्य कल्लाप्पा कांबळे आदी उपस्थित होते.


Recent Comments