Belagavi

अनगोळ येथे जय महाराष्ट्राच्या घोषणा…

Share

बेळगाव शहरातील अनागोळ येथे कन्नडिगांच्या कराच्या पैशातून छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करून महाराष्ट्रातील नेत्यांना निमंत्रित करून जय महाराष्ट्राच्या घोषणा देणाऱ्या बेळगाव दक्षिणचे आमदार, महापौर, उपमहापौरांसह नगर सेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी कर्नाटक रक्षणा वेदिकेने केली आहे .

बेळगाव शहरातील अनागोळ येथे कन्नडिगांच्या कराच्या पैशातून छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळ्यात महाराष्ट्रातील नेत्यांना बोलावण्यात आले होते . या प्रसंगी त्यांनी जय महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या. मात्र हे पाहून देखील मौन बाळगलेल्या बेळगाव दक्षिणचे आमदार, महापौर, उपमहापौरांसह नगर सेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी कर्नाटक रक्षणा वेदिकेने करून शहर पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केले. काल रात्री याच्या विरोधात टिळकवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावेळी बोलताना दीपक गुडगनट्टी यांनी कन्नडिगांच्या कराच्या पैशातून अनागोळ येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. या सोहळ्याला महाराष्ट्रातील नेत्यांना बोलावण्यात आले होते . या प्रसंगी त्यांनी जय महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या. मात्र हे पाहून देखील मौन बाळगलेल्या बेळगाव दक्षिणचे आमदार, महापौर, उपमहापौरांसह नगर सेवक मौन बाळगले.

त्यामुळे बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील, महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण आणि नगर सेवकांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.सरकारने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून महापालिका विसर्जित करावी, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी कर्नाटक रक्षणा वेदिकेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

Tags: