Belagavi

किल्ला दर्गा उर्स निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Share

बेळगाव : हजरत सय्यदिना शेख बद्रोदिन आरिफ चिस्ती (रह.)किल्ला बेळगाव यांचा 798 व्या संदल उर्स निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवारी 10 जानेवारी रोजी कुराण पठण करण्यात येणार असून शनिवार 11 जानेवारी रोजी संदल होणार आहे. शनिवारी दुपारी बागवान गल्ली बेळगाव पासून किल्ला पर्यंत संदल आणण्यात येणार आहे. रविवार 12 जानेवारी रोजी दुपारी 12 लंगर (प्रसाद) वितरण उर्स होणार असून रविवारी रात्री 9 वाजता मुंबईचे प्रसिद्ध कव्वाली गायक अजीज नाजा यांचा कव्वाली कार्यक्रम होणार आहे या शिवाय सोमवारी 13 जानेवारी रोजी रात्री 9 वाजता मोहसीन चिस्ती यांचा महफिल ए समा कार्यक्रम होणार आहे.

या निमित्ताने कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बद्रोदिन दर्गा किल्ला ट्रस्ट कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी
रफिक मुजावर किल्ला
+917090577865

Tags: