कर्नाटक राज्य सहकारी रेशन डिस्ट्रिब्युटर्स वेल्फेअर डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष शांतीनाथ बुडवी आणि अन्न विभागाचे सहाय्यक संचालक निजाम अहमद कनवल्ली यांनी बेळगाव येथील संगमेश्वर नगर येथील सरकारी रास्त धान्य दुकानाला भेट देऊन अन्नअदालत घेतली व जनतेच्या तक्रारी घेतल्या.
कर्नाटक राज्य सहकारी रेशन डिस्ट्रिब्युटर्स वेल्फेअर डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष शांतीनाथ बुडावी आणि अन्न विभागाचे सहाय्यक संचालक निजाम अहमद कनवल्ली यांनी मंगळवारी बेळगाव येथील संगमेश्वर नगर येथील सदाशिव पाटील यांच्या रेशन दुकान क्रमांक 312 ला भेट दिली. यावेळी अन्नअदालत घेण्यात आली व जनतेच्या तक्रारी ऐकून घेतल्या .

यावेळी बोलताना अन्न विभागाचे सहाय्यक संचालक निजाम अहमद कनवल्ली म्हणाले की, अन्न विभागाकडून दर महिन्याच्या ७ तारखेला रास्त भाव दुकानांना भेटी दिल्या जातात. लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या रेशनमध्ये काही त्रुटी आहेत का आणि सरकारकडून दिलेला पैसा त्यांच्यापर्यंत पोहोचतोय की नाही, याची माहिती घेतली जात आहे. जनतेच्या तक्रारी प्राप्त करून , त्यांच्या समस्या तत्काळ सोडविण्यासाठी कार्यवाही केली जाते.
शासनाचे अनुदान यापूर्वीच ग्राहकांच्या खात्यात जमा झाले आहे. तसेच उर्वरित रक्कम लवकरच जमा केली जाईल. सरकारने यापूर्वीच सर्व्हरची समस्या सोडवून नवीन सर्व्हर उपलब्ध करून दिले आहेत. ग्राहकांना काही अडचण आल्यास अधिकाऱ्यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन करता येईल, असे ते म्हणाले.
यामध्ये संगमेश्वर नगरच्या रेशन दुकानाच्या ग्राहकांचा समावेश आहे.


Recent Comments