6 जानेवारी रोजी दिवंगत माजी केंद्रीय मंत्री बाबागौडा पाटील यांच्या जयंतीसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या लढ्याच्या प्रारूपावर चर्चा करण्यात येईल, असे अखंड कर्नाटक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन वाली यांनी सांगितले.
मल्लिकार्जुन वाली आज बेळगाव येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, 6 जानेवारी रोजी दिवंगत बाबागौडा पाटील यांची जयंती त्यांचे जन्मस्थान असलेल्या चिक्कबागेवाडी येथे मोठ्या प्रमाणात साजरी केली जाईल. यावेळी शेतकऱ्यांच्या गंभीर समस्यांवर चर्चा करून शेतकरी संघटनांना एकत्र करून सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलनाचे स्वरूप निश्चित केले जाईल.
शेतकऱ्यांना त्यांच्या समस्यांचा योग्य न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने वागणूक बदलली पाहिजे. सरकार प्रत्यक्ष समस्यांपासून दूर जाऊन भावनिक मुद्द्यांवर बोलत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये फसवणूक होऊ शकते. हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांवर एकही गंभीर चर्चा झाली नाही,” असे ते म्हणाले.
6 जानेवारी रोजी कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित केले जाईल. याचवेळी शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सरकारचे लक्ष वेधून घेणारे आंदोलनदेखील करण्यात येईल. “सध्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखाने प्रतिसाद देत नाहीत, त्यामूळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी येत आहेत,” असे मल्लिकार्जुन वाली यांनी स्पष्ट केले.
अखंड कर्नाटक शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष धर्मराज गौडर यांनी सांगितले की, 6 जानेवारी रोजी दिवंगत बाबागौडा पाटील यांच्या जयंतीला विविध क्षेत्रांतील मान्यवरांना सन्मानित केले जाईल आणि शेतकऱ्यांच्या समस्यांचा मुद्दा उचलण्यासाठी आंदोलनही केले जाईल . “सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे आणि यासाठी आम्ही कठोर पावले उचलू,” असे ते म्हणाले.
यावेळी अखंड कर्नाटक शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments