शहरांमध्ये महानगरपालिकेने स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देणे महत्वाचे आहे . मात्र या ठिकाणी हुबळी धारवाड महानगर महापालिकेचे दुर्लक्ष साफ दिसून येत आहे , एका उद्यानाला लागून असलेल्या रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचले आहे . यामुळे स्थानिक रहिवाशांसह उद्यानात जाणारे मॉर्निग वॉकर्स सातत्याने महापालिकेला शिव्या देत आहेत.
धारवाडमधील , साधनकेरी पार्कच्या बाजूला रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले असून, रस्त्याच्या कडेला टाकलेल्या कचऱ्याची दुर्गंधी मॉर्निग वॉकर्सचे स्वागत करत आहे. या भागात शेकडो स्थानिक कुटुंबे राहतात आणि सर्वत्र पार्क आहेत. रस्त्यावर कचरा आणून टाकला जात असल्याने तेथील नागरिकांना संसर्गजन्य आजार होण्याची भीती आहे.

हुबळी धारवाड महानगर पालिका कचरा विल्हेवाटीसाठी कोट्यवधींचे अनुदान खर्च करते. मात्र कचऱ्याची उचल होताना दिसत नाही . रस्त्यालगतच्या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे , उद्यानात जाणारे दुर्गंधीने आजारी पडत आहेत. शिवाय, या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे स्थानिक रहिवासी हैराण झाले असून, ते महापालिकेच्या विरोधात शिव्या देत असल्याचे दिसून येत आहे.
साधनकेरी पार्कच्या आजूबाजूच्या दुकानांसह, कचरा टाकणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याबरोबरच हा कचरा उचलून चांगले वातावरण निर्माण करावे, अशी विनंती स्थानिक नागरिकांकडून महापालिकेला केली जात आहे.


Recent Comments