Uncategorized

विजयेंद्र यांच्यावर पुन्हा यत्नाळांचा निशाणा! म्हणाले…

Share

भाजप नेते आणि विजयपूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी माजी मुख्यमंत्री बी.एस. यडियुरप्पा यांचे पुत्र विजयेंद्र यांच्यावर तसेच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर तीव्र टीका केली आहे. दिल्लीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विजयेंद्र यांना “लहान मुलगा” संबोधत, यडियुरप्पा यांच्या नेत्यांवरील पकडीवर सवाल उपस्थित केला.

दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले.आजपर्यंत कोणतीही रजिस्टर पोस्ट किंवा मेल आपल्याला प्राप्त झालेला नाही. आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी विजयेंद्र यांच्यावर टीका करताना म्हटले की, विजयेंद्र हा लहान मुलगा आहे. त्यांच्या पाठीवर बंदूक ठेवून दुसरेच कोणीतरी डाव साधत आहे. येडियुरप्पा यांच्या भीतीपोटी त्यांना अध्यक्ष बनवण्यात आले आहे. येडियुरप्पा यांच्या पाठीशी लिंगायत समाज आहे हि बाबदेखील खोटी असल्याचे यत्नाळ म्हणाले.

आम. यत्नाळ पुढे म्हणाले, मी स्वतः शूर आहे. मी घाबरणारा नेता नाही. मी स्वतःच्या बळावर नेता झालो आहे, कोण कोणती सभा घेते याची मला पर्वा नाही. असे सांगून त्यांनी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांवर निशाणा साधला. यावेळी यत्नाळांनी मुख्यमंत्री सिध्दरामय्यांवरही निशाणा साधत सिद्धरामय्यांना शरण गेलेले यडियुरप्पा आणि विजयेंद्र यांनी आता घाबरायला हवे, असे ते म्हणाले.

Tags: