Dharwad

कापूस वाहून नेणाऱ्या कँटरला आग : वाहन चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण

Share

धारवाडमध्ये कापूस वाहतूक करणाऱ्या कँटरला लागलेल्या आगीत वाहनासहित कापूस भस्मसात झाला. मात्र प्रसंगावधान दाखवत चालक आणि क्लिनरने तातडीने बाहेर पडून आपले प्राण वाचवले.

धारवाड येथील विनय कुलकर्णी डेअरीजवळ राष्ट्रीय महामार्गावर एका कँटरला अचानक आग लागली. कँटर कापूस घेऊन धारवाडकडून बेळगावकडे जात असताना, वाहनामध्ये आग लागली. आगीचा पेट वाढल्याचे लक्षात येताच कँटरचा चालक आणि क्लिनर यांनी तातडीने वाहन थांबवले आणि ते दोघेही बाहेर पडले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले.

पोलिस आणि अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. यावेळी स्थानिकांच्या मदतीने मोठ्या प्रयत्नांनी आग विझवण्यात आली. या आगीत कँटरसहित कापूस देखील आगीत भस्मसात झाला आहे. ही घटना धारवाड रहदारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून आगीच्या कारणाचा शोध घेण्यात येत आहे.

Tags: