एससी एसटी अंतर्गत आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबतच्या सरकारच्या दिरंगाईच्या धोरणाचा निषेध करत अंतर्गत आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी धारवाडमध्ये बाईक रॅलीद्वारे निदर्शने करण्यात आली.
कर्नाटक मादिग दंडोर संघटनेच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी बाईक रॅलीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून राज्य सरकारविरोधात रोष व्यक्त केला. गेल्या 1 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांच्या पूर्ण खंडपीठाने एस.सी. एस.टी. आरक्षणामध्ये अंतर्गत आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला असल्याचे निकालात म्हटले आहे. मात्र सत्तेवर येणारी सरकारे त्याची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरत आहेत.
सध्याच्या सरकारला केवळ अंतर्गत आरक्षणाच्या लढ्याबद्दल कळवळा आहे, हे खरे असेल तर सहानुभूतीपूर्वक आरक्षणाचा विषय हाताळून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एससी एसटी मध्ये तात्काळ आरक्षण लागू करावे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले आहे.
Recent Comments