धारवाडमध्ये एका खासगी बसमध्ये बेकायदेशीर पद्धतीने सोने – चांदी वाहतूक करत असल्याचे उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी आरोपीला अटक करून ९८ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे अशी माहिती धारवाड उत्तर विभागाचे आयजीपी विकासकुमार यांनी दिली.
धारवाड ग्रामीण स्थानकाच्या पोलिसांनी गेल्या गुरुवारपासून एका खासगी वाहतूक बसमध्ये रेकॉर्ड नसलेले सोने आणि चांदी जप्त केली असून सुमारे 98 लाख रुपये किमतीचे सोने आणि चांदी जप्त केली आहे, असे उत्तर विभागाचे आयजीपी विकासकुमार यांनी स्पष्ट केले. धारवाड पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, नोंदणी नसलेले सोने-चांदी खासगी बसमधून नेले जात होते. या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकून सोने-चांदी जप्त केली.

याप्रकरणी राजस्थानमधील रहिवासी असलेल्या भवरसिंग चव्हाण याला अटक करण्यात आली होती. दुसरा आरोपी फरार झाला असून त्याचा शोध जारी आहे. अटक करण्यात आलेला आरोपी भवर सिंग हा मुंबईहून हुबळीला जात होता, यादरम्यान त्याच्याजवळील 87 लाख रुपये किमतीचे 1237 ग्रॅम सोने, 11 लाख किमतीची 15 किलो चांदी असा एकूण 98 लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.


Recent Comments