Banglore

संविधानाप्रती निष्ठा असेल तर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा : सी.एन. अश्वथ नारायण

Share

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मनात विवेक, नैतिकता, मूल्ये आणि संविधानाप्रती निष्ठा असेल तर त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री सी.एन. अश्वथ नारायण यांनी केली आहे.

बंगळुरूमध्ये माध्यमांशी बोलताना माजी उपमुख्यमंत्री डॉ. सी.एन. अश्वथ नारायण म्हणाले, वाल्मिकी महामंडळ आणि मुडा घोटाळ्यासह दोन घोटाळ्यांमध्ये सत्तेचा दुरुपयोग स्पष्टपणे दिसून येत आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना नैतिकता नाही, त्यांच्या वरिष्ठांनाही नैतिकता नाही. सत्तेचा गैरवापर केल्याप्रकरणी सिद्धरामय्या यांना साक्षीसह पकडण्यात आले आहे. प्रथम सिद्धरामय्या यांनी राजीनामा द्यावा, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

चन्नापट्टण मतदार संघाच्या उमेदवारी विषयी आम्ही आमच्या वरिष्ठांशी चर्चा केली आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री कुमारस्वामी यांच्याशीही चर्चा केली आहे. या निवडणुकीला एकजुटीने सामोरे जायचे ठरविले असून उमेदवार निवडीबाबतही चर्चा झाली आहे. येत्या काही दिवसात उमेदवाराचे नाव जाहीर केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

Tags: